|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » भालचंद्र महाराज जन्मोत्सव सोहळा सजावट स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद 

भालचंद्र महाराज जन्मोत्सव सोहळा सजावट स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद  

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी :

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 116 व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून कणकवली शहरात माजी नगरसेवक उमेश वाळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहयोगातून मंडळ सजावट आणि घर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून मंडळ सजावट आणि घर सजावटीने भालचंद्र महाराज पालखी सोहळ्याचा मार्ग नेत्रदीपक झाल्याचे पहावयास मिळत आहे. परमहंस भालचंद्र महाराज यांचे निस्सीम भक्त उमेश वाळके आणि प्रसाद अंधारी यांच्या सहयोगातून मागील गेल्या तीन वर्षापासून भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शहरात मंडळ सजावट आणि घर सजावट ही दीपोत्सव स्पर्धा आयोजित केली जाते. बाबांची पालखी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावर ही सजावट उत्सवाच्या कालावधीत केली जाते. या स्पर्धेचे उद्घाटन भालचंद्र महाराज आश्रम संस्थान चे अध्यक्ष पी. डी कामत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी संयोजक उमेश वाळके, प्रसाद अंधारी त्याचबरोबर प्रवीण पारकर, सुरेश महाजन, आश्रम व्यवस्थापक विजय केळूसकर, भरत उबाळे, अतुल भडगावकर, रमेश पारकर महेश अंधारी, भैया वाळके, सुनील पारकर, अण्णा कोदे, सोहम वाळके आदी उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल बोलताना उमेश वाळके म्हणाले, भालचंद्र महाराज हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे त्यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात कणकवली शहर आनंदाने न्हाहुन निघत असते. हा चैतन्यमय सोहळा साजरा करताना भालचंद्र बाबांची पालखी ज्या मार्गावरून जाते तो मार्ग सुशोभित करण्याच्या हेतूने या मार्गावर घर सजावट आणि मंडळ सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेला शहरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळतो ही आनंद व्यक्त करणारी घटना आहे.

Related posts: