|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » केंद्रातील मोदी सरकार काँग्रेसच्या वाटेवर : मायावती

केंद्रातील मोदी सरकार काँग्रेसच्या वाटेवर : मायावती 

ऑनलाइन टीम / लखनौ : 

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांचा आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या जन्मदिवशी मायावती यांनी पत्रकार परिषदचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी आणि देशवासीयांशी संवाद साधला. तर यावेळी मायावतींनी नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या.

यावेळी त्यांनी कॉंग्रेससह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. त्या म्हणाल्या, आपल्या देशाची परिस्थिती बदलेल असे वाटत होते. पण असे होताना आज दिसत नाही. आपल्या देशाची स्थिती कॉंग्रेसच्या काळात खराब होतीच तर मोदींच्या काळातही यात बदल झाला नाही, अशी टीका मायावती यांनी केली आहे.

केंद्र सरकारवर हल्ला चढवताना त्या म्हणाल्या, केंद्रातील मोदी सरकारही काँग्रेसच्या वाटेवर चालत आहे. केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत आहे त्यामुळे देशाचे वातावरण अराजकमय होत आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. देशावर मंदीचे सावट असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

Related posts: