|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » हिटमॅन रोहित शर्माला सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर

हिटमॅन रोहित शर्माला सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर 

ऑनलाइन टीम / दुबई : 

भारताचा सलामीवीर आणि हिटमॅन रोहित शर्मा याची आयसीसी ‘वन डे क्रिकेटर ऑफ द इअर 2019’ आणि भारताचा कर्णधार विराट कोहली याची ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. झाली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2019 वर्षातील पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. या पुरस्कारात भारताच्या दीपक चहरने एक विशेष पुरस्कार पटकावला.

भारताचा हिटमॅन रोहितने यंदाच्या वर्षात वर्ल्ड कप स्पर्धेत 5 शतकांसह एकूण 7 शतकी खेळी केल्या. त्याने वन डे क्रिकेटमध्ये 2019 मध्ये 28 सामन्यांत 57.30 च्या सरासरीने 1490 धावा केल्या.

 

Related posts: