|Monday, January 27, 2020
You are here: Home » विविधा » पानिपत वीर दमाजीराव गायकवाड यांना अनोखी मानवंदना

पानिपत वीर दमाजीराव गायकवाड यांना अनोखी मानवंदना 

ऑनलाइन टीम  / पुणे  : 

हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय कृष्णाजी जय दमाजी… पानिपत वीर अमर रहे… अशा घोषणांनी श्रीमंत गायकवाड सरकार सदरेचा परिसर दणाणून निघाला. बडोदा संस्थान संस्थापक पानिपत वीर सेनाखासखेल समशेर बहाद्दर पानिपतवीर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार व पानिपत वीरांना मानवंदना मर्दानी खेळ आणि तैलचित्र पूजन करण्यात आले. 

निमित्त होते, पुण्यातील श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानतर्फे दावडी निमगाव खेड येथे आयोजित मानवंदना कार्यक्रमाचे. कार्यक्रमाची सुरुवात गायकवाड किल्ल्यावर गायकवाड घराण्याचा भगवा ध्वज फडकावून करण्यात आली. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, व्याख्याते ब. हि. चिंचवडे, श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे विश्वस्त, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ५१ गावातून आलेले गायकवाड स्वराज्यघराण्याचे शेकडो वंशज, माता भगिनी, सरदारांचे वंशज, दावडी निमगाव येथील ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते. 
मदार्नी खेळांच्या मानवंदनेत श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार यांचे तैलचित्र किल्ल्याच्या वेशीपासून ते गायकवाड सदरेपर्यंत हर हर महादेवच्या घोषणांच्या गजरात गायकवाड सरकार सदरेवरील तख्तावर ठेवण्यात आले. तसेच छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व गायकवाड घराण्याशी पिढ्यान पिढ्यांची संबंध असलेले डुंबरे परिवारातील माजी सरपंच सुरेश डुंबरे व दिघे परिवारातील बाबासाहेब दिघे यांनी मोलाचे सहकार्य केले. 
यावेळी शिवजयंती महोत्सव समिती पुणे, बारा मावळ परिवार, देशमुख युवा प्रतिष्ठान, देशमुख प्रतिष्ठान यांचे सदस्य उपस्थित होते. दीप प्रज्वलन, तख्त पूजन, गायकवाडांचे पारंपरिक शस्त्र पट्टा यांचे पूजन केल्यानंतर श्रीमंत गायकवाड सरकार सदर या  सुवर्ण नामफलकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

Related posts: