|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » निर्भया : दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर

निर्भया : दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

निर्भया प्रकरणातील चौघांची 22 जानेवारीला होणारी फाशी पुढे ढकलली आहे. ठरलेल्या दिवशी फाशी शक्य नसल्याचे दिल्ली सरकारने उच्च न्यायालयाला  सांगितले आहे.

दरम्यान, चौघा आरोपींमधील एक मुकेश सिंह ने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. ती याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे प्रलंबित आहे. कैद्यांच्या नियमानुसार दया याचिका दाखल केली असेल, तर फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्यापासून वाट पाहावी लागते, अशी माहिती दिल्ली सरकारने उच्च न्यायालयाला दिली.

आरोपी मुकेश कुमारने दया याचिका दाखल केली होती. त्याने सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन फाशी वॉरंटला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे तसेच राष्ट्रपतींकडे दया याचिका प्रलंबित असल्याने फाशीच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असे याचिकेत नमूद केले आहे.

 

Related posts: