|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » आपण सगळेच दहशतवादी!

आपण सगळेच दहशतवादी! 

पुणे / प्रतिनिधी: 

 राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक या समाजाच्या सर्व क्षेत्रात जाती-धर्माचे विष कालवण्यात येत असून, जात, धर्माच्या नावाने घाण पसरली आहे. आम्हाला चित्रपट दाखवा. तो मान्य असेल, तर तो प्रदर्शित होईल, हा गाढवपणा देशात सुरू आहे. सरकारी सेन्सॉरशीप असताना, या खासगी सेन्सॉरशीपची गरज नाही. आपण सगळेच दहशतवादी झालो आहोत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ज्ये÷ अभिनेते विक्रम गोखले यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.

18 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोखले यांना ‘पिफ पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

गोखले म्हणाले, देशात असलेली जात, धर्म त्यातील असलेल्या उपजाती या घाण आहेत. हे सगळे स्वार्थासाठी केले जाते. जाती, धर्माच्या आधारे समाजामध्ये विष पसरवण्याचे काम केले जात आहे. धर्मातील भेदभाव मला कधीच पटला नाही. शासनमान्य सेन्सॉरशिप वेबसीरीजवर नाहीत, याचा गैरफायदा घेणाऱयांना रोखण्यासाठी खासगी सेन्सॉरशिप नकोच. सेन्सॉरशीप दुसऱयाकडून नकोच. शासकीय सेन्सॉरशीप योग्य आहे.

सावरकर, गांधी देव नव्हते

सावरकर ज्यांना कळालेच नाही, त्यांनी सावरकरांवर टीका करणे मला कधीच पटले नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कधी सावरकरांचा अभ्यास केला का? त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा त्यांना हक्क नाही. सावरकर, गांधी हे देव नव्हते. तीही माणसे होती. त्यांच्याकडून चुका होतात. हे आपण मान्य करत नाही, असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार हे एकमेव व्हिजनरी नेते

शरद पवार हे एकमेव व्हिजनरी नेते आहेत. ते मला ‘जाणता राजा’ म्हणा, असे म्हणणे शक्मय नाही. फारच थोडे आहेत, ते पवारांबरोबर राहू शकतात. मी मोदीभक्त नाही. नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांची तुलना करणे, हा प्रकार भयंकर आहे. छत्रपती शिवाजीराजे हे राजे आहेत. आपल्याला समजले पाहिजे आपण काय बोलत आहोत. जिभेला लगाम घालायला हवा, असे टीकास्त्रही गोखले यांनी सोडले.

नाही म्हणण्यासाठी धाडस लागते

हिंदी कलाकार काय, मराठी कलाकार काय, एकत्र येण्यासाठी धाडस लागते. नाही म्हणण्यासाठीही धाडस लागते. मात्र, हे धाडस दाखविणे सगळय़ांना शक्मय नसते. सगळे कलाकार हे स्वतःला असुरक्षित समजत असतात. मी कधीही स्वतःला असुरक्षित समजलो नाही, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. लागूंचा उल्लेख केल्याशिवाय चालणार नाही

डॉ. श्रीराम लागू यांच्याशी माझे अनेक वर्षे ऋणानुबंध होते. भारताच्या उत्तम अभिनेत्यांबद्दल बोलायचे म्हटले, डॉ. लागूंचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

 

 

Related posts: