|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’

‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई / प्रतिनिधी

देशाची आर्थिक राजधानी असणाऱया मुंबईत एखादी शहराचा लौकिक वाढविणारी वास्तू असावी त्यादृष्टीने ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ‘मुंबई आय’ वांद्रे-वरळी सी लिंकच्याजवळ करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केली.

लंडन शहरात थेम्स नदीच्या किनारी सर्वात उंच आणि मोठा पाळणा असून या पाळण्यातून लंडन शहर पाहता येते. तसेच या पाळण्याची उंची सर्वाधिक असल्याने पर्यटकांना नेहमीच ‘लंडन आय’चे आकर्षण राहिले आहे. मुंबईतही आकाशातून हे शहर कसे दिसते याबाबत सर्वांना आकर्षण आहे. मात्र, असे कोणतेच ठिकाण नसल्याने आता ‘मुंबई आय’मुळे मुंबईकरांबरोबरच पर्यटकांना मुंबई पाहता येईल.

Related posts: