|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आगीत खाक झाला तो कचरा नव्हे, कंपोस्ट खत!

आगीत खाक झाला तो कचरा नव्हे, कंपोस्ट खत! 

प्रतिनिधी/ पणजी

पाटो-पणजी येथील हिरा पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या प्रकल्पातील ज्या कचऱयास आग लागली तो कचरा म्हणजे उपयुक्त असे ‘कंपोस्ट खत’ असून ते नेण्यासाठी कोणीच तयार नसल्याने तसेच त्याबाबत जागृती न झाल्यामुळे ते मौल्यवान ‘खत’ कचऱयाच्या स्वरुपात तेथे पडून असल्याचे समोर आले आहे.

 पणजी महानगरपालिकेतर्फे पाटो कचरा प्रकल्प चालवण्यात येत असला तरी त्यात तयार होत असलेल्या ‘कंपोस्ट’च्या विक्रीची मात्र मनपाने फारशी दखल घेतलेली दिसून येत नाही.

 कचरा-खताकडे मनपाचे दुर्लक्ष

   कचऱयाला आग भडकल्यामुळे त्याचा तसेच तेथे तयार झालेल्या कंपोस्ट खताचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तेथील कचऱयाच्या खताचा नियोजनबद्ध वापर केल्यास त्याची विल्हेवाट यशस्वीपणे होऊ शकते, परंतु ते काम कोणीच करायला तयार नाही. सरकारही त्यात फारसे लक्ष घालत नाही, पणजी मनपा स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने त्यांनीच त्या कचऱयाचा सुयोग्य वापर करण्याची गरज आहे, असे सरकारी सुत्रे सांगतात.

 पुढे काय? याचे नियोजनच नाही

   पणजी मनापातर्फे तेथे कचरा साठवण्याची फक्त सोय करण्यात आली आहे. त्याचे पुढे काय करायचे? यावर मनापाकडे कोणतेच उत्तर नाही. त्यामुळे तेथे टाकण्यात येणाऱया कचऱयाचे तयार होणाऱया खताचे पुढे काय करायचे? याचे नियोजन कोणाचकडे नाही. आता त्याच कचऱयास आग लागल्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने आव्हान बनून पणजी मनपापुढे उभा राहिला आहे.

Related posts: