|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी 

ऑनलाइन टीम / कटक : 

भुवनेश्वर दरम्यान धावणाऱया लोकमान्य टिळक एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. यामुळे एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. या अपघातात 40 प्रवाशी जखमी झाले आहेत. तसेच, यामधील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी सलगाव आणि नरगुंडी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मुंबई-भुवनेश्वर या लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे आठ डबे रूळावरून घसरून अपघाता झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

दरम्यान, दाट धुके असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, दाट धुक्यामुळे समोर असलेल्या मालगाडीला लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने धडक दिल्याने रूळावरून घसरल्याचेही सांगण्यात येत आहे.

 

Related posts: