|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » सातारा शहरात कडकडीत बंद

सातारा शहरात कडकडीत बंद 

सातारा / प्रतिनिधी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा शहरात आज कडकडीत उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आला. आज सकाळी गांधी मैदानात श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्यास नगरसेवक निशांत पाटील, अविनाश कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, प्रशांत आहेराव यांनी अभिवादन करून कार्यकर्त्यांनी जोरदारपणे घोषणा देत सातारा शहरातून रॅली काढली. या रॅलीत एवढी गर्दी कशाला..संजय राऊतांच्या मयतीला, भाड खाऊ भाड खाऊ संजय राऊत भाड खाऊ अशा घोषणा देत पोवई नाक्यापर्यंत रॅली काढली. तर भाजपच्या वतीने मोती चौकात निदर्शने करण्यात आली यामध्ये भाजपचे सातारा शहराध्यक्ष नगरसेवक विश्वास गोसावी, धनंजय जांभळे,विजय काटवटे, प्राची शहाणे, विठ्ठल बलशेठवार, प्रवीण शहाणे, राहुल शिवनामे, निलेश नलावडे, डेजयदीप ठुसे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. युवकांच्या एका ग्रुपने शहरातून दुचाकी रॅली काढली. गांधी मैदानालगत संजय राऊत यांचा प्रतिकात्म पुतळा दहन करण्यात आला यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related posts: