|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » दहशतवाद संपवण्यासाठी अमेरिकेच्या मार्गावर चालावं लागेल : बिपीन रावत

दहशतवाद संपवण्यासाठी अमेरिकेच्या मार्गावर चालावं लागेल : बिपीन रावत 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

रायसीना डायलॉग 2020 मध्ये बोलताना आज, भारताचे पहिले चीफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी भारत – पाकिस्तान संबंधाबद्दल भाष्य केले आहे. दहशतवादाला संपवण्यासाठी आपल्याला अमेरिकेच्या मार्गावर चालावं लागेल. अमेरिकेनं 9।11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाला संपुष्टात आणण्यासाठी कठोर पावलं उचलली होती.

जनरल बिपीन रावत म्हणाले, दहशतवादाविरोधात अद्याप लढाई संपलेली नाही. ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील. जोपर्यंत दहशतवादाच्या मुळाशी आपण पोहचत नाही तोपर्यंत नाईलाजानं आपल्याला यासोबत राहावं लागेल. तसेच जोपर्यंत दहशतवादाला प्रोत्साहन देणारे देश आहे तोपर्यंत आपल्याला या धोक्मयाचा सामना करतच राहावा लागेल. आपल्याला यावर निर्णायक रुपात दोन हात करावे लागतील.

दहशतवादाविरुद्ध लढाई संपत आलीय, असा आपल्याला वाटत असेल तर आपण चूक आहोत. आंतरराष्ट्रीय युद्धात सहभागी होणाऱया आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱया देशासोबत मैत्री होऊ शकत नाही. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱया देशांना राजनैतिक स्तरावर धडा शिकवायला हवा. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱया देशाला जबाबदार धरायला हवं, असं बिपीन रावत यांनी म्हटलंय.

 

 

Related posts: