|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महादेव माने यांना विवेक सेवा सन्मान पुरस्कार

महादेव माने यांना विवेक सेवा सन्मान पुरस्कार 

  एकसंबा :

येथील स्वामी विवेकानंद युवा विकास संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विवेक सेवा सन्मान पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार महादेव मारुती माने यांना देण्यात आला. संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सुरेश शहा तर शामा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंचाक्षरी मठपती यांनी स्वागत, भीमा हिटणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संजय आडके म्हणाले, स्वामी विवेकानंद यांचे कार्य देशहिताचे आहे. त्यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेऊन आजच्या युवकांनी देशासाठी कार्य केले पाहिजे. युवकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱया भारतातील प्रत्येक युवकामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे. महापुरुषांचे विचार हे नेहमीच दिशादर्शक ठरतात. स्वामी विवेकानंदांचे विचारही देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राणलिंग स्वामीजी म्हणाले, भारतीय संस्कृतीत गायीला फार मोठे महत्त्व आहे. शुभ कार्यासाठी आपण गायीची पूजा करतो. पण गायीचे संगोपन करत नाही. प्रत्येकांनी देशी गायीचे संगोपन करणे आवश्यक आहे. विवेकानंद संस्थेतर्फे विवेक गो सेवा परिवाराची केलेली स्थापना कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.

विवेक गो सेवा परिवाराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ज्युडो व कराटेत राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविलेल्या रोहित बडिगेर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी भालचंद्र बाकळे, चंद्रकांत खोत, डॉ. कुमार कुंभार, शेखर उमराणे, रामकृष्ण खेत्रिबा, शिवानंद रुकडे, रविंद्र खोत, संतोष अलगुरे, कृष्णा हालकाटे, विजय भावे, राजू जाधव, उमेश सातवर, राजू पुजारी, शरद शिंदे, जकाप्पा खोत, रमेश कम्मार, सदानंद हिरेमठ, कुमार शिरशेट्टी यांच्यासह स्वामी विवेकानंद युवा विकास संस्थेचे पदाधिकरी व मान्यवर उपस्थित होते. शिवाजी गोटुरे यांनी सूत्रसंचालन तर महेश बाकळे यांनी आभार मानले.

Related posts: