|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » माझे भाग्य ते रुक्मिणी

माझे भाग्य ते रुक्मिणी 

पवित्र अशा प्रभास क्षेत्री भीष्मक राजा श्रीकृष्णाला शरण आला. त्याने अत्यंत नम्रतेने सद्गदित अंतःकरणाने कृष्णाला लोटांगण घातले. भीष्मक म्हणाला, देवा! आमचे अपराध पोटात घाल. आमचे रक्षण कर. आम्ही तुला शरण आलो आहोत. भीष्मकाच्या डोळय़ातून अश्रू वाहू लागले. देवाच्या मनात कृपा उपजली. तो धावतच पुढे आला. त्याने भीष्मकला उचलून घेतले व त्याला गळामिठी दिली. दोघेही जणू एकरूप झाले. जीविचा जो जीव आहे त्या भगवंताची मिठी कशी सुटणार? कृष्णाने कृपादृष्टीने भीष्मकाकडे पाहिले. तो सच्चिदानंदाने तृप्त झाला. त्याच्या मनीचे आर्त फिटले. तो कृतकृतार्थ झाला.

मग म्हणे जयजय चक्रपाणी । माझे भाग्य ते रुक्मिणी ।

विनटली तुझ्या चरणी । कुलतारिणी चिद्गंगा ।।

शुद्ध करीत दोही कुळा । जेवी प्रवाह गंगाजळा ।

तेवी जन्मली हे बाळा । सकळ कुळा उद्धार ।।

श्रद्धा शांती निवृत्ती भक्ती । ते हे भीमकी निजमूर्ती।

तुज वोपिलो श्रीपती । एक विनंती परिसावी ।।

वीर्यशौर्य भीमकीहरण । करिता नलगे अर्धक्षण ।

आता विधियुक्त कन्यादान । पाणिग्रहण करावे ।।

हेचि विनंती गरुडध्वजा । चारी दिवस माझी पूजा ।

अंगिकाराची अधोक्षजा । दास मी तुझा निजभावे ।।

भीष्मक नम्रपणे लीन होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, हे चक्रपाणी! तुझा जयजयकार असो! माझे भाग्य असलेली माझी कन्या रुक्मिणी तुझ्या चरणी लीन झाली आहे. ती आमच्या कुलाची तारीणी चिद्गंगाच आहे. दोन्ही तिरांना गंगा जशी पवित्र करते तशी कन्या सासर व माहेर अशा दोन्ही कुळांचा उद्धार करते. भिमकी हे श्रद्धा, शांती, निवृत्ती आणि भक्ती यांचे मूर्तीमंत रूपच आहे. ही माझी कन्या मी तुला अर्पण करीत आहे. तरी हे श्रीपती माझी एक विनंती ऐकावी. रणामध्ये पराक्रम करून रुक्मिणीचे हरण करायला तुला एक क्षणही लागला नाही. तरी आता मी विधियुक्त कन्यादान करून तुला माझी कन्या अर्पण करू इच्छितो. आपण तिचे विधिवत पाणिग्रहण करावे. देवा! मी तुझा दास आहे. चार दिवस माझ्या पूजेचा स्वीकार करावा अशी नम्र विनंती आहे.

ऐका श्रीकृष्णविंदान । भक्ताधीन होय आपण ।

भीमकीचे पाणिग्रहण । भावे जाण करीतसे ।।

होते श्रीकृष्णाचे मनी । जे संभ्रमे पर्णाची रुक्मिणी ।

देवकी सुभदादि आणोनी । महोत्सव करावा ।।

हेचि भीमकीच्याही चित्ती । सोहळेनि वरावा श्रीपती।

हळदी लावीन आपुले हाती । बोहल्याप्रती बैसोनि ।।

दोघांसीही प्रीतिकर । भीमक बोलिला नृपवर ।

कृष्णासी मानले उत्तर । हर्षे निर्भर भीमकी ।।

कृष्ण म्हणे ज्ये÷ माझा । दादोजीस विनंती करा जा ।

राम नमस्कारी राजा । चरण वोजा धरियेले ।।

कृष्णासी म्हणजे बळिभद्र । होसी कार्यार्थी अतिचतुर ।

समे उठवूनि नृपवर । थोर सन्मान त्या केला।।

Related posts: