|Monday, February 17, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » प्रश्नोत्तरे प्रहेलिका

प्रश्नोत्तरे प्रहेलिका 

 वरवर पाहता या प्रहेलिकातील शब्दांचा अर्थ आपणाला परिचित असतो, दुसरा वेगळाच अर्थ सहसा माहीत नसतो. पण एखादी हुशार व्यक्ती त्याच शब्दांचा वेगळय़ा अर्थी वापर करून समोरच्याला कसा चितपट करतो, हे पाहणे मनोरंजक आहे. त्यासाठी आपण शिवपार्वती यांच्यातील ही प्रश्नोत्तरे पाहूया. पार्वतीने शिवाला कसे निरुत्तर केले हे पाहून आपण अचंबित होतो. ‘कस्त्वं?’ ’शूली’ ‘मृगय भिषजं’ ‘नील-कण्ठः प्रियेएहम्’। ‘केकां एकां कुरु’ ‘पशु-पतिः ‘नैव दृश्ये विषाणे’। ‘स्थाणुः मुग्धे’ न वदति तरुः जीवितेशः शिवाया: ‘गच्छाटव्यां’ इति गिरिजया निर्जितः चन्दचूडः।। ह्या श्लोकातील शब्दांचे दोन वेगवेगळे अर्थ पाहू. शूली-त्रिशूल धारण करणारा, दु:ख, पोटशूळ, नीलकंठ-विषप्राशनामुळे निळा कंठ झालेला, मोर, पशु-पति- शंकर, श्रे÷ पशु नंदी. स्थाणु-शंकर, झाड, एकाच जागी स्थिर. शिवा-पार्वती, कोल्हीण. शिवायाः जीवितेशः-शंकर, कोल्हा. चंद्रचूड-चंद्र आहे मस्तकी ज्याच्या, शंकर. पार्वती आणि शंकर यांच्यातील संवाद पहा. पार्वती-कोण आपण?..  शंकर-शूली (मी शंकर) पार्वती-(दुसरा अर्थ घेऊन) मग वैद्याकडे जा. शंकर-प्रिये मी नीलकंठ….  पार्वती-मग एक केका कर बरं! शंकर-मी पशुपती आहे. …पार्वती-मग शिंगे दिसत नाहीत ती?   शंकर-अगं वेडे मी स्थाणु. (शंकर).पार्वती- इश्श! झाड बोलते का कधी? शंकर-(कंटाळून) शिवा हिचा मी सर्वस्व आहे. पार्वती-(कोल्हीण असा अर्थ घेऊन) मग अरण्यात जा. तिथेच तुझी प्रिया भेटेल. अशा प्रकारे गिरीजेने चंद्रचूडास जिंकले. नवऱयाच्या डोक्मयावर बसलेली गंगा आणि पार्वती यांच्यात धुसफुस चाले. आपले मन तिने लाडक्मया मुलाकडे…षडाननाकडे मोकळे केले. तेव्हा रागावलेल्या षडाननाने वडिलांना खडसावले. षडानन-अम्बा कुप्यति तात! मुर्ध्नि विधृता गङ्गेयमुत्स्रुज्यताम् शंकर- विद्वन् षण्मुख!सन्ततं मयि रता, तस्याः गतिः का वद । कोपाटोप-वशाद् विवृद्धवदनः प्रत्युत्तरं दत्तवान् षडानन- अम्भोधिः जलधिः पयोधिरुदधिः वारां-निधिः वारि-धिः।। अर्थः-षडानन-बाबा,आईला राग येतो. डोक्मयावर बसवलेल्या या गंगेला टाकून द्या बरं! शंकर:- अरे (दीड)शहाण्या षण्मुखा, ती नित्य माझ्यातच रमली आहे. तिने कुठे जावे?  सांग. रागाच्या भरात तोंड मोठे करून (उद्धटपणे) षडाननाने उत्तर दिले. षडानन-सागर, सागर, सागर, सागर, सागर, सागर (हीच तिची गति आहे). ह्या श्लोकात प्रश्नोत्तरांबरोबरच एक समस्यापूर्ती आहे. परंतु ह्यात पहिल्या तीन पंक्ती ही समस्यापूर्ती असून शेवटची पंक्ती ही समस्या आहे. त्यात सागराला उद्देशून सहा शब्द आहेत. एखाद्या गोष्टीचा तीनदा उच्चार केला की, ती पक्की होते. इथे षडाननाने आपल्याला सहा तोंडांनी प्रत्येकी एकेक शब्द उच्चारला. त्यांचा अर्थ सागर आहे. गंगेची सागर हीच नैसर्गिक गती आहे. तिला डोक्मयावर बसवण्याऐवजी फेकून द्या असे षडाननाला सुचवायचे आहे.

 

Related posts: