|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » बाईक रॅलीच्या माध्यमातून पोलिसांची जागृती

बाईक रॅलीच्या माध्यमातून पोलिसांची जागृती 

प्रमुख मार्गावर वाहतूक पोलिसांनी काढली रॅली

31 व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता सप्ताहाच्या पार्श्वभूमिवर गुरुवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन वाहतूक पोलिसांनी बाईक रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून वाहतूक नियम सुरक्षितते विषयी पोलिसांनी जागृतीचा उपक्रम राबविला.

गुन्हे तपास वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोधा वंटगोडी यांनी रॅलीचे उद्घाटन केले. यावेळी वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंभार आदी वरि÷ अधिकाऱयांच्या उपस्थितीत संगोळ्ळी रायण्णा सर्कलपासून गुरुवारी सकाळी बाईक रॅलीला सुरुवात झाली.

किल्ला, मध्यवर्ती बस स्थानक, आरटीओ सर्कल, राणी चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, गोगटे सर्कलहून पुन्हा धर्मवीर संभाजी चौक मार्गे, किलोस्कर रोड, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजारमार्गे आरटीओ सर्कलला येवून रॅलीची सांगता झाली.

Related posts: