|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » पोलीस आयुक्त कार्यालयाचा कोनशिला आठवडय़ाभरात

पोलीस आयुक्त कार्यालयाचा कोनशिला आठवडय़ाभरात 

सिटीपोलीस लाईन परिसरात उभारणा इमारत

पोलीस आयुक्त कार्यालयाचा कोनशिला समारंभ येत्या आठवडय़ाभरात होणार आहे. यासाठी गृहमंत्री बसवराज बोम्मई बेळगावला येणार आहेत. सिटी पोलीस लाईन परिसरात इमारत उभारणी होणार आहे.

सध्या जुन्या पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्तांचे कार्यालय सुरु आहे. आयुक्त, दोन उपायुक्त त्यांची कार्यालये यासाठी ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी प्रयत्न सुरु होते. राज्य सरकारने नव्या इमारतीसाठी 17 कोटी रुपये मंजुर केल्याची माहिती मिळाली आहे.

नव्या इमारतीसाठी आराखडा तयार झाला असुन उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी यासंबंधी गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करुन सातत्याने पाठपुरावा केला होता. सिटी पोलीस लाईन परिसरात सध्या ज्या परिसरात पोलीस वसतीगृह आहे त्याच परिसरात आयुक्त कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,.

उपलब्ध माहितीनुसार टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आठवडय़ाभरात कोनशिला समारंभ होणार आहे. त्यानंतर बांधकामाला सुरुवात होणार आहे. आयुक्त कार्यालयासाठी शहरातील अनेक ठिकाणी जागांची पाहणी करण्यात आली.

आरटीओ सर्कल जवळ असलेल्या इमारतीत हे कार्यालय सुरु करण्याचाही प्रयत्न झाला. सिटीपोलीस लाईनमध्ये आयुक्त कार्यालय उभारुन आरटीओ सर्कलमधील इमारतीचा वापर प्रशिक्षण बंदोबस्थासाठी परजिह्यातून येणाऱया पोलिसांच्या वास्तव्यासाठी करण्यात येणार आहे.

Related posts: