|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बोलोली येथे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

बोलोली येथे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन 

सांगरूळ / वार्ताहर

बोलोली ( ता. करवीर) येथे शिवसेनेच्यावतीने नव्याने संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवास वातकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बोलोलीचे सरपंच सदाशिव बाटे होते.

यावेळी बोलताना सरपंच बाटे यांनी, बोलोली व उपवडे परिसरातील वाड्या वस्त्या मधील जनतेला वैयक्तिक लाभाच्या सर्व शासकीय योजनांची माहिती मिळावी व योग्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या योजनांचा लाभ मिळवण्यात सुलभता यावी म्हणून हे संपर्क कार्यालय सुरू केले असल्याचे सांगीतले. या कार्यालयाच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजनांचा परिसरातील सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच बाटे यांनी यावेळी केले.

सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक शिवाजी पाटील यांनी केले यावेळी संताजी पाटील, रघुनाथ मंडलीक , शिवाजी बाटे, शिवाजी पाटील, शैलेश बाटे, तकाराम पाटील, सदा बाटे, आनंदा राणे, तुकाराम पाटील, प्रकाश पाटील, यांचेसह परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते. आभार रघुनाथ मंडलिक यांनी मानले.

Related posts: