|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बैलगाडीच्या धडकेत कारचालक जखमी

बैलगाडीच्या धडकेत कारचालक जखमी 

प्रतिनिधी/बाळेकुंद्री

यल्लमा यात्रा आटोपून परत जाणार्‍या एका बैलगाडीची समोर येणाऱ्या कारला धडक झाली. या धडकेत कारचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी कारचालकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बैलहोगल जवळच्या नयानगर पुलाजवळ हा अपघात घडला. रस्त्यावर बैलगाड्यांच्या शर्यतीच्या चढाओढीत बैलगाडीने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जखमीचे नाव मात्र अद्याप समजू शकले नाही .

Related posts: