|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » राजगडाच्या बालेकिल्ल्यावर अभियंत्याचा ह्दयविकाराने मृत्यू

राजगडाच्या बालेकिल्ल्यावर अभियंत्याचा ह्दयविकाराने मृत्यू 

ऑनलाईन टीम : पुणे

राजगडाच्या अति दुर्गम बालेकिल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या विकास बिरुदेव गावडे ( वय 45 , राहणार, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली ) या अभियंत्याचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

ही घटना आज गुरुवारी (16) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राजगडाच्या अति दुर्गम बालेकिल्ल्याच्या दरवाजात घडली.

अति दुर्गम बालेकिल्ल्यावर खडकातील पाऊल वाटेने चढाई केल्यानंतर विकास गावडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते दरवाजाच्या चौथऱ्यावर कोसळले. ते तेथेच पडले होते. मात्र अर्धा पाऊण तासाने त्यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, अशी माहिती वेल्हा येथील सरकारी रुग्णवाहीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल बोरसे यांनी दिली आहे. मयत विकास गावडे हे वाळवा तालुका इंजिनीअर असोनिएशनचे अध्यक्ष आहेत.

विकास गावडे यांच्यासमवेत इस्लामपूर येथील 35 जण आज सकाळी राजगडावर फिरण्यासाठी आले होते.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने लोंखडी शिडीवर त्यांना ठेवून खाली आणले. घटनेची माहिती मिळताच वेल्हा पोलीस ठाण्याचे अभय साळुंखे, राजगड पोलीस ठाण्याचे गणेश लडकत यांनी गुंजवणे, पाल येथील होमगार्ड, कार्यकर्तयसह घटना स्थळी धाव घेतली. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांच्या पोलीस पथकाने सरकारी रुग्णवाहीकेतून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री भोर येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात नेला.

या प्रकरणी वेल्हा पोलिस तपास करत आहेत.

Related posts: