|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खाते नंबरच्या घोळाचा शेतकऱयांना फटका

खाते नंबरच्या घोळाचा शेतकऱयांना फटका 

प्रतिनिधी/गडहिंग्लज

केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सन्मान योजना राबविली आहे. चार महिन्याला दोन हजार शेतकऱयाच्या नावे वर्ग केले जात आहेत. अद्यापही बऱयाच शेतकऱयांना ही मदत मिळत नाही. याची खोलात जाऊन चौकशी केली असता बऱयाच शेतकऱयांचे खाते नंबरच चुकल्याने त्याचा फटका शेतकऱयांना सोसावा लागत आहे. गडहिंग्लज तालुक्यात असे प्रमाण बऱयापैकी असल्याचे चौकशीत समजले.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतून चार महिन्याला दोन हजार म्हणजे वर्षाला सहा हजार रु. दिले जातात. यासाठी शेतकऱयाचे आधार कार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक जमा केले आहेत. शेतकऱयांनी याची माहिती महसूल यंत्रणेकडे दिलीही आहे. मात्र सदर रक्कम जमा होताना खाते नंबर बदलला गेल्याने अनेक शेतकऱयांचे पैसे इतरांच्या खात्यावर जमा झाल्याचे दिसते आहे. हिरलगे येथील निशिकांत कोकीळे या शेतकऱयालाही असाच अनुभव आला आहे. या शेतकऱयाने आपले आयडीबीआय बँकेचा गडहिंग्लज शाखेतील खाते क्रमांक दिला होता. योजना सुरु होऊन वर्ष झाले तरी या शेतकऱयाला पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतील एक पैही जमा झाली नाही. याची अधिक चौकशी केल्यावर खाते क्रमांकाची सुरुवात 11 ऐवजी 91 अशी केल्याने अन्य शेतकऱयाच्या नावे राज्यातील अन्य बँकेत मदत जमा झाल्याचे दिसून आले. याबाबत श्री. कोकीळे यांनी स्थानिक बँकेत संपर्क साधला असता दुसऱयाच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचे सांगितले. मात्र ही रक्कम आपल्या खात्यावर वर्ग करणे बँकेच्या हातात नाही. ज्या व्यक्तीने सदर रक्कम जमा केली आहे. त्याच व्यक्तीला अर्ज देऊन रक्कम अन्य खातेदाराच्या नावावर वर्ग करता येणार आहे. ही नवी अडचण शेतकऱयांसमोर तयार झाली आहे.

श्री. कोकीळे यांनी याबाबत प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांची भेट घेऊन सारी माहिती सांगितली. असा बऱयाच शेतकऱयांना फटका बसला आहे. खाते क्रमांक मारताना क्रमांक चुकल्याने असे प्रकार घडल्याचे दिसते आहे. याबाबत तहसीलदार यांनी सदर माहिती घेऊन वरीष्ठांना सांगून संबंधीत जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधत अन्य खात्यावर वर्ग झालेला निधी आपल्या नावावर देण्याचे आश्वासन दिले आहे. पण हे केव्हा वर्ग होणार ? असा प्रश्न निशिकांत कोकीळे यांनी विचारला आहे.

Related posts: