|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘अथर्व -दौलत’कडून 31 डिसेंबरअखेरचे बिले जमा

‘अथर्व -दौलत’कडून 31 डिसेंबरअखेरचे बिले जमा 

प्रतिनिधी/चंदगड

अथर्व-दौलत साखर कारखान्याकडे 31 डिसेंबर 2019 अखेर गाळपासाठी आलेल्या उसाची बीले ऊस उत्पादक शेतकऱयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली.

 कारखाना अडीअडचणीवर मात करत प्रशासनाने योग्य गाळप केले असून चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील ऊस उत्पादक शेतकऱयांनी अथर्व-दौलत साखर कारखान्यावर आपला विश्वास ठेवून ऊस पुरवठा केलेल्या सर्व ऊस उत्पादकांची ऊस बीले जमा केली आहेत. त्याचप्रमाणे तोडणी वाहतुकीची बीले देखील वेळचेवेळी अदा केली जात आहेत. याबाबतची माहिती अर्थवचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली. तसेच येथून पुढेही ऊस उत्पादकांनी सहकार्य करून पिकविलेला संपूर्ण ऊस अथर्व-दौलत साखर कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: