|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » शाहू समाधी स्मारक लोकार्पण सोहळा लोकोत्सव करा : महापौर

शाहू समाधी स्मारक लोकार्पण सोहळा लोकोत्सव करा : महापौर 

प्रतिनिधी/कोल्हापूर

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकस्थळाचा लोकार्पण सोहळा रविवार 19 जानेवारी रोजी होत आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. लोकार्पण सोहळा लोकोत्सव व्हावा. यामध्ये करवीरवासियांनी सहकुटुंब सहभागी व्हावे, सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभाग नोंदवावा. आपल्याला लोकराजासाठीएक दिवस देत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर यांनी गुरुवारी केले.

लोकार्पण सोहळय़ानिमित्त आयोजित लोकात्सवास गुरुवारपासून प्रांरभ झाला. या निमित्ताने संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महापौर ऍड. लाटकर म्हणाल्या, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे आज खऱया अर्थाने कोल्हापूर जिल्हा सर्वच बाजूने सुजलाम, सुफलाम आहे.तळागाळातील दीन-दुबळय़ा, शोषित, वंचीत घटकातील प्रत्येकाचा विकास व्हावा, यासाठी कृतीशील प्रयत्न केले. कला आणि कलाकारांनाही राजाश्रय दिला. सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्राची जोपासना केली. कोल्हापुरला समृद्ध बनवणाऱया या लोकराजाच्या समाधी स्मारक स्थळाचा लोकार्पण सोहळा रविवारी दिमाखात होणार आहे. करवीरवासियांनी सोहळय़ात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर ऍड. लाटकर यांनी केले.

Related posts: