|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लोकोत्सवात खाद्यपदार्थाच्या दालनांवर ग्राहकांची गर्दी

लोकोत्सवात खाद्यपदार्थाच्या दालनांवर ग्राहकांची गर्दी 

प्रतिनिधी / पणजी :

 कला व संस्कृती खात्यातर्फे कलाअकादमीच्या दर्यासंगमावर आयोजित केलेल्या लोकोत्सवामध्ये ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. 10 जानेवारी पासून सुरु झालेल्या या लोकोस्तवामध्ये राज्यभराप्रमाणे शेजारी राज्यातील लोकही येत आहेत. हस्तकलेची अनेक दालने असून यात महिलांसाठी लागणाऱया साहित्याची जास्त प्रमाणात दालने पहायला मिळत आहे. त्यामुळे या लोकोत्सवात जास्तीत जास्त  महिलांची गर्दी पहायला मिळत आहे.

 यावर्षी दालनांची संख्या जास्त आहे त्यामुळे खास खव्वयांसाठी अनेक दालने आहेत. यात गोमंतकीय खाद्य पदार्थांची अनेक दालने आहेत यात गोवन चिकन, मटन थाली, मासळी तसेच रस ऑब्लेट असे रुचिक पदार्थ मिळत आहे त्याचप्रमाणे घरघुती बनविलेले लाडू, चिवडा, चकल्या अशी महिलामंडळाची दालने घालण्यात आली आहे त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 तसेच परराज्यातील म्हणजे राजस्थानी खाद्याची दालने आहेत यात राजस्थानी मावा कुल्फी, ढोकला, गोबी मन्चुरम तसेच अन्य विविध राज्यातील खाद्य पादार्थ मिळत आहे. तसेच मसाल्याची दालने यात अनेक गावठी पद्धतीचे मसाले मिळत आहे. तसेच घरघुती बनविलेले अन्य खाद्य पदार्थ येथे या लोकोत्सवात मिळत आहेत. खवय्यासाठी अनेक दालने येथे आहेत या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

Related posts: