|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडकईतील जॉर्गस ट्रकच्या कामाला आजपासून सुरुवात

मडकईतील जॉर्गस ट्रकच्या कामाला आजपासून सुरुवात 

वार्ताहर / मडकई :

ज्येष्ठ नागरिक व युवकांसाठी परत एकदा मडकईत जॉगर्स टॅकची सोय करण्यात येईल. युवकांचे शरीर सुदृढ व्हावे, तसेच ज्येष्ठ नागरिक तंदुरूस्त असावे याच उद्देशाने हे जॉगर्सचे बांधकाम केले होते. मात्र गॅस पाईप लाईन टाकताना कसलाच विचार न करता हा जॉगर्स ट्रक उखडून टाकलेला आहे. त्यामुळे नियमितपणे जॉगींग करण्याऱयांना ही समस्या निर्माण झालेली आहे. श्रीफळ अथवा पायाभरणीचा शुभारंभ न करता थेट या जॉगींग टॅकच्या कामाला आजपासून सुरूवात केली जाईल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी या स्थळी पाहणी करताना दिली.

मडकई येथील श्री नवदुर्गा विद्यालय ते श्री गणेश मंदिर पर्यंत असलेल्या या जॉगर्स ट्रकच्या स्थळी पाहणी करताना आमदार श्री. ढवळीकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंते अरविंद फडते, प्रियोळ जिल्हा सदस्य शिवदास गावडे, सरपंच अस्मिता मडकईकर, उपसरपंच योगेश गावडे, पंचसदस्य विशांत नाईक, वासू नाईक, लक्ष्मी तारी, दिपा नाईक, शैलेंद्र पणजीकर, रोहन कुंकळय़ेकर, सर्वेश तळावलीकर, साई नाईक आदी उपस्थित होते.

मडकईतील मैदान सुसज्ज झाल्यानंतर या मैदानाचे सुशोभिकरण केले जाईल. मडकईतील औद्योगिक वसाहतीकडे 1999 साला पासून आपण लक्ष देत आहे. येथील वसाहतीत वाढलेल्या बेकायदा कामाकडे पंचायतीला लक्ष घालण्याचीही सूचना दिलेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना येथील आडण व आक्सण भागात कधीच पाण्याची टंचाई भासत नव्हती. मात्र आता ही समस्या उद्भवू लागलेली आहे, असे आमदार श्री. ढवळीकर यांनी पूढे बोलताना सांगितले.

Related posts: