|Thursday, February 20, 2020
You are here: Home » leadingnews » फरार दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक

फरार दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक 

ऑनलाईन टीम  कानपूर :
अजमेर बॉम्बस्फोटातील फरार गुन्हेगार डॉ. बॉम्ब उर्फ मोहम्मद जालीस अन्सारी याला उत्तर प्रदेशातील कानपूर येथून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर असताना जलीस अन्सारी मुंबईतून फरार झाला होता. तो देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता.  
त्याला कानपूर येथे अटक केल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी दिली. कानपूर येथे अटक केल्यानंतर त्याला लखनऊ येथे आणण्यात येणार असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. 
दरम्यान, 1993 मध्ये अजमेर येथील बॉम्बस्फोट प्रकरणात तो दोषी आढळला. त्यानंतर चौकशीअंती त्याचा देशभरातील अनेक बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून, सध्या तो 21 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आहे.

Related posts: