|Monday, February 17, 2020
You are here: Home » leadingnews » निर्भया : चारही दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी

निर्भया : चारही दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. या संदर्भातल दिल्ली कोर्टाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे.

दरम्यान, या चौघांपैकी एक दोषी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केल्याने आधी ठरलेली 22 जानेवारी ही फाशीची तारीख पुढे गेली होती. शुक्रवारी राष्ट्रपतींनी त्याचा दयेजा अर्ज फेटाळल्याने चौघांना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला.

आता दिल्ली न्यायालयाने नवं डेथ वॉरंट जारी केली आहे. या डेथ वॉरंटनुसार 1 फेब्रुवारीला निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाणार आहे. सकाळी 6 वाजता ही फाशी दिली जाणार आहे.

 

Related posts: