|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » केरळनंतर पंजाब विधानसभेचा CAA विरुद्ध ठराव

केरळनंतर पंजाब विधानसभेचा CAA विरुद्ध ठराव 

ऑनलाइन टीम / चंदीगड  : 

केरळ विधानसभेनंतर आता पंजाब विधानसभेनेही नागरिकत्व संशोधन कायद्याविरुद्ध (सीएए) ठराव मंजूर केला आहे. पंजाब विधनसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवशेनाच्या आजच्या दुसऱया दिवशी सरकारमधील मंत्री ब्रह्म मोहिंद्रा यांनी नागरिकत्व कायद्याविरुद्ध ठराव मांडला.

नागरिकत्व कायदा लोकशाही विरोधी आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेवर आघात करणारा असल्याचे मत नोंदवत या कायद्याविरोधतील ठराव सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. हा कायदा देशाला आणखी एका फाळणीच्या दिशेने ढकलणारा आणि भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप यावेळी मोहिंद्रा यांनी केला.

दरम्यान, पंजाबमध्येही या कायद्याविरुद्ध जनतेने रस्त्यावर उतरून आपली नाराजी व आक्षेप नोंदवला. या जनभावनेचा आदर करून हा कायदा आम्ही फेटाळत असल्याचे मोहिंद्रा यांनी नमूद केले. या ठरावावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर आवाजी मतदानाने ठराव मंजूर करण्यात आला.

 

Related posts: