|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी बीएसएनएलच्या चाव्या कोल्हापूरच्या हाती!

रत्नागिरी बीएसएनएलच्या चाव्या कोल्हापूरच्या हाती! 

– 230 पैकी 164 जानेवारीअखेर स्वेच्छानिवृत्त

प्रतिनिधी/ रत्नागिरी

केंद्र सरकारने भारत संचार निगम या उपक्रमातील कर्मचाऱयांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केल्यानंतर रत्नागिरी जिह्यातील 230 कर्मचाऱयांपैकी तब्बल 164 कर्मचाऱयांचे निवृत्ती प्रस्ताव मंजूर झाले आहेत. या सर्व कर्मचाऱयांच्या कामाचा शेवटचा दिवस 31 जानेवारी 2020 हा राहणार आहे. या नंतरची बहुतांश कामे कंत्राटी कर्मचाऱयांकडे सोपवली जाणार आहेत. तूर्त महत्वाची कामे कोल्हापूरच्या कार्यालयाकडे सोपवण्यात आली आहेत.

बीएसएनएलचे प्रभारी महा व्यवस्थापक श्रीकांत मब्रूखाने म्हणाले, बीएसएनएलमध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर झाली. त्यासाठी जिह्यातील 164 कर्मचाऱयांनी दिलेले प्रस्ताव मंजूर झाले. एकूण 230 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 66 कर्मचारी कामावर शिल्लक राहणार आहेत. ते पुढे म्हणाले, गेल्या 6 महिन्यांपासून रत्नागिरी कार्यालयातील बरीच कामे कोल्हापूर कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहेत. नव्या योजनांचे नियोजन असो अथवा आस्थापनाविषयक निर्णय असोत हे कोल्हापूरमधील अधिकारी करत आहेत. रत्नागिरीत निर्णय घेणारे अधिकारी आता कार्यरत नाहीत.

त्यांनी पुढे सांगितले, टेलिफोनच्या बिलींगची शाखा रत्नागिरीत कार्यरत आहे. बिलांच्या संदर्भातील तक्रारींची दखल, त्याचबरोबर जनसंपर्काची कामे येथील कर्मचारी करत आहेत. 31 जानेवारीनंतर 164 कर्मचारी निवृत्त होतील. केवळ 66 कर्मचारी कार्यरत राहतील. त्यांच्या मदतीसाठी कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी कार्यरत होतील. कंत्राटाविषयीचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर होईल. त्याची अंमलबजावणी रत्नागिरीतच नव्हे तर देशभरात होईल

Related posts: