|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अल्पवयीन मुलीसोबत शारिरिक संबंध, आरोपीला शिक्षा

अल्पवयीन मुलीसोबत शारिरिक संबंध, आरोपीला शिक्षा 

10 वर्ष कारावास व 10 हजार दंड , सत्र न्यायालयाचा निकाल

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरालगत राहणाऱया 15 वर्षीय मुलीसोबत शारिरिक संबंध प्रस्थापित करून तिचे गर्भधारणेस कारणीभूत ठरलेल्या तरूणाला न्यायालयाने 10 वर्ष कारावास व 10 हजार दंडाची शिक्षा ठोठावल़ी दिनेश लक्ष्मण धोत्रे (21, ऱा रत्नागिरी) असे या तरूणाचे नाव आह़े

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकारी पक्षाच्यावतीने ऍड़ प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिल़े पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत तरूणी व आरोपी हे एकाच गावात राहाणारे आहेत़ त्यांचे एकमेकांच्या घरी सातत्याने येणे जाणे होत असल्याने ओळख निर्माण झाली होत़ी  यातून पिडीत मुलगी व दिनेश यांच्यात प्रमसंबध निर्माण झाले होत़े

 24 जानेवारी ते 11 फेबुवारी 2017 या काळात पिडीत मुलगी व आरोपी यांच्यात शारिरिक संबंध निर्माण झाल़े दरम्यान निसर्गाने आपले काम केल्याने पिडीत मुलगी ही गरोदर राहिल़ी सहा महिन्यानंतर मुलीच्या आईला संशय आल्याने मुलीकडे विचारणा केली असता तिने दिनेश याचे नाव सांगितल़े पिडीतेच्या पालकांनी याबाबत दिनेश याला विचारणा केल़ी मात्र ‘तुमची मुलगी मला फसवत आहे, ते बाळ माझे नाही’ असे दिनेश याने सांगितल़े

     याबाबत पिडीत मुलीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिनेश याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार पोलिसांनी तपास करून दिनेश याच्याविरूद्ध भादवि कलम 376 व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल केल़ा तसेच न्यायालयात दोषारोपपत्र ठेवले होत़े शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी या खटल्याचा निकाल देत दिनेश याला शिक्षा ठोठावल़ी सरकारी पक्षाच्यावतीने 10 साक्षीदार तपासण्यात आल़े पैरवी अधिकारी म्हणून एस़ बी शिंदे यांनी काम पाहिल़े

 

Related posts: