|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » हातखंबा येथे ट्रक 35 फूट खोल नदीत कोसळल्याने दोघे जखमी

हातखंबा येथे ट्रक 35 फूट खोल नदीत कोसळल्याने दोघे जखमी 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील महाविद्यालयासमोरील वळणावर आज एक ट्रक 30-35 फूट खोल नदीत कोसळल्याने चालकासह दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, आज दुपारी एक वाजता हा दहा चाकी ट्रक एम.एच. 14- एफ.टी. 7299 मुंबईच्या दिशेने चालला होता. तो हातखंबा महाविद्यालयासमोरील वळणावर आल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ट्रक 30-35 फूट खोल असलेल्या नदीत कोसळला. या अपघातात चालक सहदेव भिमराव लोखंडे (वय 29, रा. यवतमाळ) व संतोष दशरथ भालेराव (वय 30, रा. पुणे) हे दोघेजण जखमी झाले. अपघातस्थळी लोकांची गर्दी झाली. काहींनी त्यांना ट्रक केबिनमधून बाहेर काढून वरती रस्त्यावर आणले. महामार्ग पोलिस तातडीने अपघातस्थळी आले व त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठविण्यास मदत केली.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली. त्यातून दोघा जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले.

 

Related posts: