|Saturday, February 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दासबोधाद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य

दासबोधाद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य 

समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा विश्वातील प्रत्येक मनुष्यप्राण्यास यथायोग्य नीट आणि समंजसपणाने जगण्याचे साधन आहे. मनुष्य जन्मामध्ये आपला संपर्क हा सातत्याने मनुष्यप्राण्याशीच येतो. प्रत्येक मानवाचे अंतर्मन जाणणे हे प्रत्येक मानवाला एका मनुष्यजन्मात शक्मय नाही. पण जे लोक आपल्या संपर्कात सातत्याने, नियमितपणे येत असतात त्यांच्याशी आपला व्यवहार आणि आपल्याशी असलेला त्यांचा व्यवहार हा मानसिक आणि बौद्धिक पातळीवर जर तपासून पहायचा असेल तर दासबोधापेक्षा किंवा दासबोधाव्यतिरिक्त अन्य उत्तम दुसरे साधन अथवा परिमाण नाही. जे दासबोधाचे साधक सातत्याने दासबोधाचा अभ्यास करत असतात त्यांना क्षणाक्षणाला समर्थांच्या वचनांचा, ओव्यांचा प्रत्यय येतो.  आपल्या संपर्कात येणारी व्यक्ती तिचे गुण-अवगुण याचे नीट आकलन दासबोधातील अनेक लक्षणांद्वारे करता येते. वाचकांनी पण याचा स्वानुभव घ्यावा आणि समर्थांचे कृपाभिलाषी व्हावे.

व्यवस्थापन शास्त्रात मुलाखत, मुलाखतीचे उद्दिष्टय़ आणि मुलाखतींच्या प्रकारांद्वारे उद्योग समूहांची भरभराट शक्मय आहे हे सप्रमाण सिद्ध करण्यात आले आहे. मुलाखत घेताना उमेदवाराची योग्यता आणि अपेक्षा जाणून घेऊन त्याला संबंधित उद्योग समूहाविषयीची माहिती देणे, त्याला विश्वासात घेऊन त्याची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पाश्चात्य व्यवस्थापन शास्त्रानुसार मुलाखतीची चार उद्दिष्टे सांगण्यात आली आहेत. त्यापैकी निवड आणि नियुक्तीकरिता योग्य उमेदवाराचे परीक्षण करणे, उमेदवाराला आवश्यक तथ्यांची माहिती करून देणे, मुलाखतीनंतर उमेदवाराला निवडीसंबंधी होकार किंवा नकार मिळो. परंतु, त्याला आस्थापनेविषयी सद्भावना निर्माण व्हावी. मुलाखत देणे किंवा घेणे म्हणजे संबंधित उद्योगसमूहाची प्रचिती येण्याची क्रिया होय. त्यात मुलाखत देणारा आणि घेणारा हे संभाषणाद्वारे एकमेकांचे निरीक्षण करतात. यात जो किंवा जी उत्तम निरीक्षक असतात तेच मुलाखतीत यशस्वी होतात. ज्याप्रमाणे उमेदवाराला उद्योग समूहात नोकरी करण्याची इच्छा किंवा गरज असते, त्याप्रमाणेच प्रत्येक उद्योगसमूहाला योग्य उमेदवाराचीसुद्धा गरज असते. म्हणूनच अनेक उद्योगसमूह हे चांगल्या उमेदवाराच्या निवडीकरिता निवड/भरती संस्थांना संपर्क करतात. त्यामध्ये हिं् tद हिं् Rाम्rल्ग्tसहू  अर्थात उमेदवार ते आस्थापनापर्यंत भरती प्रक्रिया राबवण्यात येते.

निर्देर्शित मुलाखतीद्वारे उमेदवाराचे कार्य, इतिहास, सामाजिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीद्वारे निवड करण्यात येते. उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची मूल्यांकनाद्वारे काही तांत्रिक पद्धतीने पण मुलाखत घेतली जाऊ शकते. या तांत्रिक पद्धतीत काही प्रश्नांद्वारे उमेदवाराचे अंतरंग जाणून घेण्यात येते. पूर्वग्रह दोष आणि त्याचे निराकरण या पद्धतीत वापरण्यात येते. तसेच अनेक विषयांवर उमेदवाराला मतप्रदर्शन करण्यास वाव देण्यात येतो आणि त्याद्वारे मुलाखतीवेळी उमेदवाराची कोणतीही टीका किंवा समर्थन केले जात नाही. नेमके तथ्य जाणून घेण्याची ही प्रक्रिया आहे.

जे कर्मचारी कमी कुशल अथवा कमी गुणवत्तेचे असतात त्यांना अशा स्वरूपाच्या मुलाखतीद्वारे निवड केली जाते. अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्रश्न त्यांच्या कार्यकौशल्यासंबंधी विचारले जात नाहीत, तर उमेदवाराचे व्यक्तिमत्व, अभिरूची, प्रेरणा, श्रद्धा, समज, गैरसमज याविषयी जाणून घेण्यात येते. प्रतिरूप मुलाखतीद्वारे स्थैर्य, चिकाटी, आत्मविश्वास, नि÷ा या निकषांच्या आधारे उमेदवाराची योग्यता, नेतृत्व आणि स्पर्धा या गुणांचे मूल्यांकन करता येते.

समर्थांनी अतिशय समर्पकरित्या प्रचिती निरुपण समासात म्हटले आहे की,

संगती चोराची धरिता । घात होईल तत्वता ।

ठकु सिंतरू शोधिता । ठाईपडे ।।

गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।

नाना कपट परोपरी । शोधून पाहावे ।।’’

म्हणजे चोराच्या संगतीने घात होतो. ठकवणारा किंवा सिंतरू नीट पाहिले/शोधले तर समजतो. खोटे नाणे, शिक्के बनवून फसवतात. काही कपट करून लोकांना फसवतात.

या ओव्यांचा संदर्भ हा योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता किंवा उमेदवाराला योग्यसंधी मिळवून देण्याकरिता होऊ शकतो.

आजकाल अनेक फसवे, खोटे लोक नवनवीन कंपनी, संस्था, आस्थापना सुरू करतात आणि गरजवंताची फसवणूक करतात. त्यांना खोटी आश्वासने आणि मोह दाखवतात. त्यामुळे अनेक चांगल्या उमेदवारांना योग्य नोकरीची संधी मिळत नाही. परिणामतः असे अनेक लोक जे नोकरीच्या शोधात असतात त्यांना वैफल्य येत आणि समाजात बेकारी, बेरोजगारीची समस्या वाढून अनेक अनुचित प्रकार घडतात.

आपल्या देशात नव्वदच्या दशकानंतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे पसरत गेले. यामुळे निश्चितच आपल्या देशाची प्रतिमा उंचावली पण त्यासोबतच अनेक तरुण-तरुणींना बेकारी आणि बेरोजगारीला तोंड द्यावे लागले. कारण बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी लावून देण्याच्या अमिषाने काही संस्थांनी अनेक गरजवंत प्रतिभावंत आणि पात्र उमेदवारांचे नुकसान केले. जसे पात्र आणि योग्य उमेदवारांचे नुकसान झाले तसेच आपल्या देशात नव्या जोमाने सुरू झालेले उद्योगधंदे, कंपन्यासुद्धा अयोग्य, अवगुणी, गुणवत्ता नसलेल्या कर्मचाऱयांमुळे, अधिकाऱयांमुळे, कामगारांमुळे बंद पडल्या.

आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात कंपनीचे मालक, संचालक मंडळ, प्रमंडळ, कामगार संघटना, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, ग्राहक यांचा योग्य ताळमेळ न जमल्याने फसवाफसवीचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे अनेक लोकांची आयुष्येही उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यांच्यात गुणवत्ता आणि प्रतिभा आहे त्यांना संधी नाही आणि ज्यांच्यात प्रचंड अवगुण आहेत अशांना उच्चपदे देण्यात आली आहेत. त्यामुळे समाजाचे मानसिक आरोग्य धोक्मयात येऊन असंतोषाची निर्मिती होते आहे.

या सर्व परिस्थितींवर समर्थांनी योग्य भाष्य करून दासबोधाद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले आहे. म्हणूनच ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा प्रस्थापित व्यवसायात गति निर्माण करायची असेल अशांनी व्यवस्थापन शास्त्राचा नीट अभ्यास दासबोधाच्याद्वारे करावा. जेणेकरून व्यवहारात चुका कमी होऊन आपण अधिकाधिक परिपक्व होऊन स्वतःचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास करू शकू!

माधव किल्लेदार

Related posts: