|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दिल्लीकरांसाठी ‘आप’चे ‘हमी पत्र’

दिल्लीकरांसाठी ‘आप’चे ‘हमी पत्र’ 

नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी एक ‘हमी पत्र’ जारी केले आहे. यात दिल्लीकरांना 10 आश्वासने दिली आहेत. या आश्वासनात विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवास आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ‘मोहल्ला मार्शल’ तैनात करणे यांचा समावेश असून, त्यांचा पक्ष ‘आप’ दिल्लीत पुन्हा सत्तेत आल्यानंतर या गोष्टी पूर्ण करणार आहे. तसेच 200 युनिटपर्यंतची मोफत वीज योजना, मोफत आरोग्य सुविधा, दोन कोटी वृक्ष लागवड, स्वच्छ यमुना नदी आणि पुढील पाच वर्षात दिल्लीतील प्रदूषण कमी करण्याच्या आश्वासनांचा यात समावेश आहे.

दिल्लीतील लोकांना 10 आश्वासने देत असून, हा जाहिरनामा नाही. आम्ही येत्या सात ते दहा दिवसात मोठा जाहिरनामा प्रसिद्ध करू. यात अजूनही काही गोष्टी असतील, विशेषतः विद्यार्थी, शिक्षकांसाठी आणि सर्वांसाठीही, असे केजरीवाल यांनी सांगितले. विरोधीपक्ष सांगत आहेत की आमच्या काही योजना 31 मार्च पर्यंतच सुरू राहतील. मात्र, आमची खात्री आहे की, या योजना पुढील पाच वर्षांपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच 24 तास विज पुरवठय़ासह 200 युनिट विज मोफत योजना सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. हमी पत्रात 11 हजारांहून अधिक बसेस आणि दिल्ली मेट्रो नेटवर्कची लांबी 500 किलोमीटरपेक्षा अधिक वाढविण्याचे आश्वासनही यात दिले असून, हमी पत्रावर केजरीवालांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Related posts: