|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बंदुकीतून सुटलेल्या छऱयातून बालक जखमी

बंदुकीतून सुटलेल्या छऱयातून बालक जखमी 

कामथे-हुमणेवाडी येथे खेळताना घडली घटना -जखमी बालकाला कराडला हलवले

चिपळूण

घराच्या पाठीमागे ठेवलेल्या छऱयाच्या बंदुकीचा खेळताना चाप ओढला गेल्याने त्यातून सुटलेला छरा लागून बालक जखमी झाला. ही घटना तालुक्यातील कामथे-हुमणेवाडी येथे शनिवारी दुपारी 1.30 वाजता घडली. यात जखमी झालेल्या बालकास कराड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेची येथील पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

यश सुधीर धांगडे (7, कामथे-हुमणेवाडी) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामथे-हुमणेवाडी येथे पाच बालके खेळत होती. यातील शिवम सचिन हुमणे (10, कामथे-हुमणेवाडी) याच्या घराच्या पाठीमागे ठेवलेली छऱयाची बंदूक खेळता-खेळता शिवम याने उचलली व त्याच्या हातून अचानक चाप ओढला गेला. त्यामुळे समोर असलेल्या यशच्या बरगडी हा छरा घुसला. यामुळे तो खाली कोसळला व वेदनेने तडफडू लगला. यामुळे इतर खेळणाऱया बालकानी आरडाओरडा केला. तो ऐकून घरातील माणसांनी त्या दिशेन धाव घेतली. त्यानंतर यशला उचलून तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्याला कराडला हलवण्यात आले आहे.

दरम्यान, ही बंदूक सचिन शांताराम हुमणे यांच्या मालकीची आहे. ती घरालगत असलेल्या शेतीच्या संरक्षणासाठी वापरली जाते, अशी माहिती या घटनेनंतर हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर यांनी केलेल्या चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे सध्यातरी केवळ घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास   आंबेरकर करीत आहेत.

Related posts: