|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » निर्भया : आरोपी पवनच्या याचिकेवर आज सुनावणी

निर्भया : आरोपी पवनच्या याचिकेवर आज सुनावणी 

ऑनलाइन टीम  / नवी दिल्ली : 

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा टाळण्यासाठी आरोपी पवन गुप्ता यांने आज पुन्हा नवीन युक्ती करत याचिका दाखल केली आहे. यासाठी त्याने असा दावा केला की घटनेच्या वेळी तो अल्पवयीन होता. त्याच्या दाव्याच्या सत्यतेची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आज त्याच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.

दोषी पवनने न्या. आर. भानुमति, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर हायकोर्टाच्या निकालाला आव्हान दिले होते. या घटनेच्या वेळी तिने अल्पवयीन असल्याची विनंती फेटाळून लावली होती. दोषीने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, 16 डिसेंबर 2012 रोजी तो गुन्हा घडला तेव्हा तो अल्पवयीन होता.

दरम्यान, पवन यांनी असा युक्तिवाद केला आहे की वयाची तपासणी करण्यासाठी त्याच्या हाडांची तपासणी अधिकाऱयांनी केली नव्हती. त्याने सर्वोच्च न्यायालयात अल्पवयीन असल्याचा खटला चालू ठेवण्याची विनंती केली आहे. तसेच पवनने याचिकेत 1 फेब्रुवारी जारी केलेल्या डेथ वॉरंटवर स्थगितीची मागणी केली आहे.

 

 

 

Related posts: