|Monday, February 17, 2020
You are here: Home » leadingnews » जे. पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

जे. पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

राधामोहन सिंह यांनी नड्डा यांच्या नाव जाहीर केल्यानंतर  मावळते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले. नड्डा यांचा कार्यकाळ 2022 पर्यंत असणार आहे.

दरम्यान, निवडणुकीसाठी नड्डा यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यानंतर सर्व औपचारिकता पार पडल्यानंतर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात जे.पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अमित शाह यांचे उत्तराधिकारी म्हणून जे. पी. नड्डा यांच नाव आघाडीवर होतं.

 

 

Related posts: