|Monday, February 17, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘झुंड’साठी बिग बी-नागराज मंजुळे एकत्र

‘झुंड’साठी बिग बी-नागराज मंजुळे एकत्र 

 

ऑनलाईन टीम / मुंबई

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये पाठमोरे उभे असलेले अमिताभ बच्चन दिसत आहेत. विचार करताना दिसत आहेत.मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत.

अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले असल्यानं ‘झुंड’बद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे.‘झुंड’ हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव चित्रीकरण थांबवावं लागलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा होती. निर्मात्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर बिग बींनी होकार कळवला. या सर्व अडचणींनंतर अखेर ‘झुंड’चं शूटिंग नागपूरमध्ये अखेर पार पडलं.

Related posts: