|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » निर्भया : आरोपी पवन अल्पवयीन असल्याची याचिका कोर्टाने फेटाळली

निर्भया : आरोपी पवन अल्पवयीन असल्याची याचिका कोर्टाने फेटाळली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : 

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा टाळण्यासाठी आरोपी पवन गुप्ता यांने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.

दरम्यान, पवन गुप्ता याने नवीन युक्ती करत असा दावा केला होता की, घटनेच्या वेळी तो अल्पवयीन होता. त्याच्या या दाव्याच्या सत्यतेची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. 

आज कोर्टाने सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय घेतला की, हा विषय यापूर्वी घेण्यात आला असून त्याला कनिष्ठ न्यायालयांनी नकार दिला होता. त्यामुळे हायकोर्टाचा निकाल योग्य होता आणि आम्हांला या याचिकेत काही नवीन दिसत नाही, म्हणूनच ही याचिका फेटाळून लावली जाते. 

 

Related posts: