|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » काश्मीर : तीन दहशतवादी ठार

काश्मीर : तीन दहशतवादी ठार 

ऑनलाईन टीम / जम्मू : 

जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिह्यात सुरक्षा दलांनी सोमवारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. शोपियन जिह्यातील वाची भागामध्ये ही चकमक झाली. हे दहशतवादी एका घरामध्ये लपले होते.

सुरक्षादलांनी त्या घराला घेरुन दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला सांगितले, तेव्हा त्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला जवानांनी सडेतोड उत्तर देत तीन दहशतवाद्यांना ठार केले. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याची ओळख पटली असून, त्याचे नाव अदिल शेख आहे. पीडीपीचे माजी आमदार एजाज मीर यांच्या जवाहर नगरमधील घरातून आठ शस्त्रे लुटल्याचा त्याच्यावर आरोप होता. 29 सप्टेंबर 2018 मध्ये त्याने ही चोरी केली होती.

वासीम वानी असे दुसऱया मृत दहशतवाद्याचे नाव आहे. तो शोपियनचाच राहणार होता. तिसऱया दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सुरक्षा दलांना या मृत दहशतवाद्यांकडे शस्त्रास्त्रे सापडली आहेत.

 

Related posts: