|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » ‘तरूण भारत’ ने शंभर वर्षात विश्वासार्हता जपली!

‘तरूण भारत’ ने शंभर वर्षात विश्वासार्हता जपली! 

प्रतिनिधी / रत्नागिरी

वाचकांना काय हवे आहे? आणि काय नको हे ‘तरूण भारतने स्वीकारले आहे म्हणूनच वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. केवळ बातम्या न छापता वाचकांकडून याविषयी सूचना ऐकून घेण्याची भूमिकाही आम्ही बजावतो म्हणूनच या शंभर वर्षाच्या कालावधीत ‘तरूण भारतने काही कमावले असेल तर ते ‘विश्वासार्हताअसे प्रतिपादन तरूण भारत चे मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक प्रभू यांनी केले.

मारूती मंदिर येथील जोगळेकर हॉलमध्ये मंगळवारी विधानसभा निकालावर आधारीत ‘कोण नेताकोण विजेताया प्रश्नमंजुषा कार्यकमाचा बक्षिस समारंभ पार पडला. या कार्यकमाचा शुभारंभ दीपप्रज्वलाने करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तरूण भारत चे मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक प्रभु, रत्नागिरी आवृत्तीप्रमुख राजाराम खानोलकर, स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जागृत होंडाच्या डायरेक्टर रेश्मा जोशी, लायन्स क्लबचे सूर्यकांत जाधव, महाकाली इलेक्ट्रॉनिकचे स्वप्नील आंब्रे, अरिहंत कन्स्ट्रक्शनचे महेश गुंदेचा, खातू मसाले शृंगारतळीचे लेखापाल वैभव अडमकर आदी उपस्थित होते.

आज ‘तरूण भारतने जी विश्वासार्हता जपली आहे त्याच विश्वासार्हता आणि वाचकांच्या पाठिंब्यामुळे आज यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सांगतानाच या सोशल मिडियाच्या जमान्यातही वाचकांच्या मनात टिकून राहण्याचीही कामगिरी तरूण भारत ने केले आहे. कोणतीही बातमी, माहिती आल्यानंतर त्वरीत ते न छापता आधी वस्तूस्थिती पडताळणी केली जाते त्याशिवाय कोणतेही वृत्त आम्ही प्रसिध्द करत नाही त्यामुळे वाचकांचा विश्वास दिवसेंदिवस वृध्दिंगत होत असल्याचे सीईओ दीपक प्रभू यांनी सांगितले.

इतकेच नव्हे तर प्रिंट आणि सोशल मिडियाचा संगम साधण्याचा प्रयत्न ‘तरूण भारतने केला आहे. केवळ बातमीदारी न करता विविध उपक्रम राबविणारे वृत्तपत्र म्हणून ‘तरूण भारतकडे पाहिले जाते. बदलत्या काळानुसार तरूण भारत ने परिस्थितीला जुळवून घेवून डिजिटल होण्याचा प्रयत्न केला आहे. आज तरूण भारत मध्ये 5 हजाराहून अधिक वितरक कार्यान्वित असल्याने प्रत्येक घराघरांमध्ये आमचा पेपर जातो ही महत्वपूर्ण बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सोशल मिडियाचे मोठे आव्हान आहे, अशाही परिस्थितीत उत्कृष्ट वृत्तपत्र देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. या सोशल मिडियामुळे आज प्रत्येक व्यक्ती रिपोर्टर बनली आहे, कोणतीही पोस्ट दुसऱया सेकंदाला सोशल मिडियावर पडते म्हणूनच तरूण भारत आज सगळ्या सोशल मिडियाचे पर्याय वापरत असल्याचे प्रभू यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या सर्व आवृत्त्यांमध्ये कोण नेता, कोण विजेता ही स्पर्धा घेतली होती. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील निवडणूक ही वेगळ्याच पध्दतीने लढविली जात असते, अशावेळी नेमका कोण नेता विजयी होणार याबद्दल अचूक तर्क लढविणे अवघड असते. तरीदेखील रत्नागिरीतील हजारो वाचकांनी आपली अचूक उत्तरे कार्यालयाकडे पाठविली. यातून 155 भाग्यवान विजेत्यांना आज गौरविण्यात येत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.

यावेळी कोण नेताकोण विजेता स्पर्धेचे प्रथम कमांकांचे विजेते कुवारबाव गणेशनगर येथील प्रसन्न विश्वास लाड यांना जागृत होंडाने पुरस्कृत केलेली होंडा अॅक्टीव्हा आय ही दुचाकी रेश्मा जोशी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली.

व्दितीय कमांकांचे पारितोषिक हे पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सकडून 15 हजाराचे गीफ्ट व्हाऊचर नाणार राजापूर येथील चैत्राली हरिश्चंद्र पेंडुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तृतीय कमांकाचे महालक्ष्मी आटा चक्की सावर्डे येथील संकेत सुरेश गवळी यांना प्रदान करण्यात आले. चौथ्या कमांकांचे अरिहंत कन्स्ट्रक्शन प्रायोजित वॉशिंग मशिन शमिका कमलेश कोकाटे यांना महेश गुंदेचा यांच्याहस्ते देण्यात आले आणि पाचव्या क्रमांकाचे महाकाली इलेक्ट्रॉनिक्सकडून मायकोवेव्ह ओव्हन निशा उमेश राजेशिर्के यांना स्वप्नील आंब्रे यांच्याहस्ते देण्यात आले.

खातू मसालेकडून लेखापाल वैभव अडमकर यांच्याहस्ते 50 स्पर्धकांना गिफ्टहॅम्पर देण्यात आले. कॉम्प्युटर कन्सेप्टकडून 30 विजेत्या स्पर्धकांना पेन ड्राईव्ह देण्यात आले. तर लायन्स क्लब फ न्यू रत्नागिरीचे सूर्यकांत जाधव यांच्याहस्ते 50 घड्याळे उपस्थित विजेत्यांना देण्यात आली. तर मलुष्टे स्टोन क्रशरकडून सौरभ मलुष्टे यांच्याहस्ते 10 विजेत्यांना इस्त्री वाटप करण्यात आले. शी एकूण150 बक्षिसे यावेळी देण्यात आली.

कार्यकमाच्या सुरूवातीला रत्नागिरी आवृत्ती प्रमुख राजाराम खानोलकर यांनी उपस्थित सर्व प्रायोजकांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. ज्येष्ठ उपसंपादक विश्वेश जोशी यांनी या कार्यकमाचे निवेदन तर आभरप्रदर्शन जाहिरात विभागपमुख भूषण प्रभुदेसाई यांनी केले.

Related posts: