|Sunday, March 29, 2020
You are here: Home » उद्योग » हय़ुंदाईची गुंतवणूक करण्यासाठी माघार

हय़ुंदाईची गुंतवणूक करण्यासाठी माघार 

दोन-तीन वर्षांसाठीचे नवीन प्रकल्प केले रद्द 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतामधील वाहन क्षेत्र मागील वर्षांपासून मंदी आणि वाहनांच्या मागणीतील घसरणीमुळे चिंतेत राहिली आहे. त्यामुळे या कारणांचा थेट परिणाम त्या कंपन्यांच्या महसूल कमाईवर झाला आहे. यासाठी काही कंपन्या नवीन भांडवल उभारणीसाठी माघार घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.  दक्षिण कोरियाची वाहन क्षेत्रातील दिग्गज वाहन कंपनी हय़ुंदाईने आपल्या प्रस्तावानुसार नवीन उत्पादन प्रकल्प आगामी दोन-तीन वर्षांसाठी बंद ठेवणार असून त्यासाठी अधिकची गुंतवणूक करणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

सध्या कंपनीचे देशातील उत्पादन आणि होणारी निर्यात यामध्ये मोठी समस्या असून त्याचा सामना करवा लागत आहे. त्यामुळे कंपनी गुंतवणूक करण्यासाठी माघार घेत असल्याचे हय़ुंदाई मोटार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस एस किम यांनी म्हटले आहे.

नवी प्रणाली लागू 

कंपनीच्या मता प्रमाणे बीएस-6 प्रणाली देशभरात लागू करण्यात येत असल्यामुळे आगामी आर्थिक वर्षात विक्रीवर सर्वाधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे मागणीत मोठी वाढ होण्याचे अनुमान मांडले आहे. भारतात आगामी 1 एप्रिलपासून नवीन प्रणालीवर(बीएस-6) आधारीत वाहनांचे उत्पादन व विक्री करण्याचा नियम सक्तीचा करण्यात येणार आहे.

विक्रीवर परिणाम

2019 मध्ये कोरिआय ऑटो निर्मिती कंपनीची देशातील विक्री 7 टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे निर्यातीत 3 टक्क्यांनी कमी आली आहे. त्यासोबत हय़ुंदाईसह मारुती सुझुकीने तिसऱया उत्पादनांतील लाइन उत्पादने उशिरा सुरु झाली आहेत. तर 2018 सारखी विक्री होण्यासाठी अजून वाहन क्षेत्राला दोन-तीन वर्षांचा कालावधी लागण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. 

Related posts: