|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » नसिरुद्दीन शाहंच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल

नसिरुद्दीन शाहंच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

बॉलिवूड अभिनेता नसिरुद्दीन शाह यांची मुलगी हीबा शाहवर पशुवैद्यकीय रुग्णालयाकडून गंभीर आरोप लावण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हीबावर दोन कर्मचाऱयांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वर्सोवा येथे राहणारी हीबा शाहची मैत्रिण सुप्रिया शर्मा ही 16 जानेवारीला तिच्या दोन मांजरींच्या नसबंदीसाठी त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन जाणार होती. पण काही कारणास्तव ती जाऊ शकली नाही. आणि त्याऐवजी नसिरुद्दीन शाह यांची मुलगी हीबा त्या मांजरींना घेऊन दुपारी अडीचच्या सुमारास रुग्णालयात पोहचली. रुग्णालयातील कर्मचाऱयांनी एक सर्जरी सुरु असल्याने हीबाला 5 मिनिटं थांबण्यास सांगितलं. पण काही मिनिटांनी हीबा त्याच कर्मचाऱयांना रागावून, आरडाओरड करत धमकावू लागल्याचा आरोप कर्मचाऱयांनी केला आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. या कॅमेरातील फुटेज मुंबई पोलिसांकडे पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी हीबा शाहविरोधत अदखलपत्र गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

 

Related posts: