|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण 

ऑनलाईन टीम / मुंबई

देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीसह देशभरात ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिवस साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी कडकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी केले आहे. मुंबईसह प्रमुख शहरांतील बसस्थानके, मॉल्सच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून श्वानपथकाद्वारे परिसराची पाहणी केली जात आहे.

Related posts: