|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराला मनसेचा विरोध

अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराला मनसेचा विरोध 

ऑनलाईन टीम / मुंबई

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अदनान सामी यांच्या पद्मश्रीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी याबाबत ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी अदनान सामीच्या पद्मश्री पुरस्कारावर नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, अदनान सामी हे मूळचे पाकिस्तानी नागरिक असून त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. मात्र, त्यानंतर मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळात त्यांना लगेच पद्मश्रीने कसे काय गौरविण्यात येते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मूळ भारतीय नसणाऱ्या अदनान सामीला कोणताही पुरस्कार देऊ नये, असे मनसेचे ठाम मत आहे. मनसे अदनान सामीला दिलेल्या पुरस्काराचा तीव्र शब्दात निषेध करत असून पद्म पुरस्कार त्वरीत रद्द करावा, अशी मागणीही खोपकर यांनी केली आहे. तसेच आपली मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण याचा विरोध करीत राहणार असेही त्यांनी म्हटले आहे.

Related posts: