|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » सीएएला विरोध केल्याने अमित शाह यांच्या समोरच तरुणाला मारहाण

सीएएला विरोध केल्याने अमित शाह यांच्या समोरच तरुणाला मारहाण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला म्हणून एका तरुणाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच जमावाने बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी शाह यांच्या सभेदरम्यान ही घटना घडली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह रविवारी दिल्लीच्या बाबरपूरमध्ये आले होते. त्यावेळी आयोजित सभेत शाह बोलत असतानाच तरुणाने उभे राहून नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्याविरोधात घोषणा दिल्या. त्यावेळी सभेला जमलेल्या जमावाने संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली. अखेर शाह यांनी मध्यस्थी केल्याने सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाची सुटका केली. त्यानंतर त्याला सभेबाहेर नेऊन सोडण्यात आले.

नरेंद्र मोदी देशहिताचे काम करत आहेत, त्यामुळे विरोधी पक्षांच्या पोटात दुखत आहे. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचा सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध आहे. त्यांनीच दंगली भडकविण्याचे काम केले असा आरोपही शाह यांनी यावेळी केला. तसेच दिल्ली त्यांच्या हातात दिल्यास ती सुरक्षित राहणार नसल्याचेही शाह म्हणाले.

 

Related posts: