|Monday, February 17, 2020
You are here: Home » leadingnews » कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होईल

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होईल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे युती होऊ शकते, असे भाकीत कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी वर्तवले आहे.

एका वृत्तवाहिनी बोलताना गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. गायकवाड म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँगेससोबत हातमिळवणी करत महाविकासआघाडी स्थापन केली. यापूर्वी हे पक्ष एकमेकांना शिव्या देत होते. ते जर आता एकत्र येऊ शकत असतील तर भाजप आणि मनसे हिंदुत्ववादी लोकांच्या हितासाठी एकत्र येऊ शकतात.

आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे युती होऊ शकते, असे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे.

Related posts: