|Monday, February 17, 2020
You are here: Home » leadingnews » मला ‘हिंदूह्रदयसम्राट’ म्हणू नका : राज ठाकरे

मला ‘हिंदूह्रदयसम्राट’ म्हणू नका : राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

हिंदुहृदयसम्राट हा मान बाळासाहेबांचा आहे, त्यामुळे मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना दिली आहे. एनआरसीच्या समर्थनासाठी मनसे नऊ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढणार आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱयांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. रंगशारदा येथे बैठक पार पडली. त्यात फक्त 10 मिनिटांची उपस्थिती लावून राज ठाकरे बाहेर पडले.

पक्षाचं पहिलं महाअधिवेशन पार पडल्यानंतर अनेकांनी राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा केला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी ही सूचना केली. ते म्हणाले,मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान फक्त बाळासाहेबांचा आहे’.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, थ्रोट इन्फेक्शन झालं असल्याने तसंच डॉक्टरांकडे जायचं असल्याने राज ठाकरे लवकर बैठकीतून निघून गेले.

 

Related posts: