|Monday, February 17, 2020
You are here: Home » leadingnews » नाशिक : रिक्षाला धडक देऊन एसटी बस विहिरीत, 7 ठार

नाशिक : रिक्षाला धडक देऊन एसटी बस विहिरीत, 7 ठार 

ऑनलाईन टीम / नाशिक : 

नाशिक जिह्यातील देवळा तालुक्यात एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली असून, त्यात 7 जण ठार झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  तर 30 ते 35 प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.

उमराणा-देवळा रस्त्यावर एसटी बसचा टायर फुटला आणि बसने रिक्षाला धडक दिली. त्यानंतर एसटी बस रिक्षासह विहिरीचा कठडा तोडून विहिरीमध्ये कोसळली. एसटी बस मालेगाववरुन कळवण येथे जात होती. एसटी बसमधून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

 

Related posts: