|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Automobiles » ‘एमजी मोटर्स’कडून ‘हेक्टर प्लस’ सादर

‘एमजी मोटर्स’कडून ‘हेक्टर प्लस’ सादर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ‘एमजी मोटर्स’ इंडियाने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आपल्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांची विशाल श्रेणी प्रदर्शित केली. यामध्ये हेक्टर ब्रॅन्डमधील नवीन 6 आणि 7 सीटर व्हॅरीयन्ट ‘हेक्टर प्लस’चा समावेश आहे. या वर्षात विक्रीसाठी उपलब्ध होणाऱया हेक्टर प्लसमध्ये आणखी सुधारित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे.

या नवीन व्हेरियंटचा लुक अधिक प्रीमियम असून, त्यात कस्टमायझेबल सीटिंगची सोय तसेच सुधारित आंतरिक व बाह्य रूप आहे. यात नवीन हेडलॅम्प्स, प्रंट ग्रिल, प्रंट/ रियर बंपर्स, रियर टेललाइट डिझाईन आणि सुधारित स्किड प्रंट/ रियर प्लेट्स आहेत. यातून हेक्टर प्लस अधिक प्रशस्त आणि आरामदायक कार अनुभवासह एकत्र प्रवास करण्याचा प्रीमियम पैलू अधोरेखित करते.

याविषयी बोलताना एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष राजीव चाबा म्हणाले, ऑटो एक्स्पो हे एमजी मोबिलिटीच्या भविष्याबद्दलचे व्हिजन अधोरेखित करण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे. हेक्टर प्लस सादर करुन आम्ही भारतात हा ब्रॅन्ड अधिक बळकट करत आहोत. ग्राहकांचे प्रेम मिळविण्यासाठी आम्ही निरंतर कार्यरत राहू, असेही ते म्हणाले.

Related posts: