|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » मनोरंजन » देवदत्त नागे-श्वेता शिंदे यांची हटके लव्हस्टोरी

देवदत्त नागे-श्वेता शिंदे यांची हटके लव्हस्टोरी 

झी युवावरील फुलपाखरू, फ्रेशर्स, लव लग्न लोचा, बन मस्का किंवा युवा सिंगर एक नंबर या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर साजणा, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण किंवा प्रेम पॉइझन अथवा युवा डान्सिंग क्वीनसारख्या आता सुरू असलेल्या नव्या फ्रेश मालिकाही प्रेक्षकांना आवडत आहेत. झी युवावर लवकरच आणखी एक धमाल विनोदी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेचे नाव आहे ‘डॉक्टर डॉन’. या मालिकेत देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे मुख्य भूमिकेत असून, त्यांची हटके लव्हस्टोरी यात पाहायला मिळणार आहे.

या मालिकेचा प्रोमो झी युवा वाहिनीवर दाखवला जात आहे. देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे हे नावाजलेले कलाकार मालिकेमध्ये काम करत आहे. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये भरपूर आहे. सध्या सुरू असलेला प्रोमो अतिशय मजेशीर असून, यात श्वेता शिंदे या एका हॉस्पिटलच्या डीनचा रोल साकारत आहेत. प्रोमोची सुरुवात श्वेता शिंदेंपासून होते. त्या नर्ससोबत हॉस्पिटलमधल्या रुग्णांची चौकशी करत एका रुग्णाच्या बेडपाशी येतात तेव्हा त्यांना कळते की, तो रुग्ण गोळय़ा घेत नाही. तेव्हा श्वेता शिंदे सांगतात, घेत नसतील तर जबरदस्ती दे हे ऐकून देवदत्त नागे आपल्या बंदुकीमध्ये औषधाची गोळी टाकून ती बंदूक त्या रुग्णाच्या तोंडात टाकतो, हे पाहून श्वेता शिंदे अतिशय चिडते आणि जोरात ओरडते. देवा यावर सांगतो जबरदस्तीने का होईना पण औषध पोटात गेलंच पाहिजे आणि बंदूक चालवतो आणि औषधाची गोळी त्या रुग्णाच्या पोटात टाकतो. हे पाहून श्वेता भडकते. असा हा मजेशीर प्रोमो सध्या टीव्ही, सोशल मीडिया आणि व्हॉट्सऍपवर खूपच गाजतोय.

देवदत्त साकारत असलेली ही भूमिका त्याने आजवर केलेल्या सर्वच भूमिकांपेक्षा वेगळी आहे. देवदत्त नुकताच ‘तानाजी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळाला  होता. या मालिकेत दोघेही उत्तम कलाकार, त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डॉक्टर डॉन आणि डार्लिंग डीन यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना 12 फेब्रुवारीपासून सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता मिळणार आहे.

Related posts: