|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह 

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडण्यात येत आहे स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पफश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे अभूतपूर्व स्थान आहे.

फक्त सनातनी हिंदूंनाच जागे करण्यासाठी नाही तर त्यावेळच्या सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि दलित-शोषितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा 2 मार्च 1930 ला सुरू झाला आणि पुढे पाच वर्ष चालला. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाची ही क्रांतिकारक घटना स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या लढय़ात कवी कुसुमाग्रज यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढय़ापासून होत गेली असे म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत दाखवल्या जाणाऱया काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये कवी कुसुमाग्रजांच्या सहभागाचाही संदर्भ दाखवण्यात येईल. ऐतिहासिक प्रसंग जिवंत करण्यासाठी सध्या मालिकेची संपूर्ण टीम दिवसरात्र राबतेय. मालिकेतील मुख्य कलाकारांसोबतच जवळपास 150 हून अधिक कलाकारांचा ताफा या खास चित्रिकरणासाठी बोलवण्यात आलाय. रिअल लोकेशन्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून काळाराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली असून, तो काळ जिवंत करण्याचे शिवधनुष्य स्टार प्रवाह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या संपूर्ण टीमने पेललं आहे. या आठवडय़ात रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाची ही क्रांतिकारक घटना पाहायला मिळणार आहे.

Related posts: